राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : बदनापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 320/24 भारतीय न्याय संहिता कलम 137 2 मधील आरोपी बळीराम जगन्नाथ थोरे, राहणार- बाजार वाहेगाव तालुका बदनापुर जिल्हा जालना याने सोळा वर्षीय पीडितेस फूस लावून बाजार वाहेगाव ता बदनापूर येथून पळवून आणून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुरणवाडी येथे दिनांक 27/08/2024 रोजी लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक सुदाम भागवत बदनापूर यांनी पोलीस उपनिरीक्षक कैलास लांडगे, महिला सहाय्यक फौजदार ज्योती खरात, पोलीस शिपाई आदर्श हुसे यांचे पथक पाठवून राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याशी समन्वय साधून तांत्रिक विश्लेषण आधारे पोलीस हवालदार जानकीराम खेमनर व गणेश सानप , प्रमोद ढाकणे यांच्यासह कुरनवाडी येथून आरोपी बळीराम जगन्नाथ थोरे, राहणार- बाजार वाहेगाव तालुका बदनापुर जिल्हा जालना यास ताब्यात घेऊन अटक करून पिडीतेची सुटका केली.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलवरणे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात संजय ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वात पोलीस हवालदार खेमणर व गणेश सानप , प्रमोद ढाकणे यांनी केली.
स्थानिक गुन्हे शाखा जालना व राहुरी पोलीस स्टेशन यांच्या समन्वयातून बदनापूर येथून अपहरण केलेल्या पीडीतेची तात्काळ सुटका

0Share
Leave a reply












