इंदापूर प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : भिगवण – राशीन रोड मृत्यूचा सापळा बनलेला आहे अश्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होताच नागरिकांच्या जनभावनेचा आदर करत साप्ताहिक व न्यूज पोर्टल एसआर 24 न्यूज़ न्यूजने बातमी प्रसारित केली होती याच बातमीची दखल घेत बंद पडलेल्या जुने भिगवन व डिकसळ या ठिकाणच्या रस्त्याच्या कामास जलदगतीने सुरुवात झाली आहे.
सदरील बातमी आठ दिवसापूर्वी प्रसारित झाली होती. एसआर 24 न्यूज़ने केला पर्दाफाश केल्यानंतर खत्री कॉन्ट्रॅक्टदाराने या बातमीची दखल घेतली असून आठ दिवसापूर्वी एसआर 24 न्यूज़ साप्ताहिक या वृत्तपत्रामध्ये भिगवन राशीन रोड चे काम अतिशय संत गतीने चालू होते त्यामध्ये जुने भिगवण व डिकसळ या ठिकाणी तर जागोजागी खड्डे व अस्ताव्यस्त पडलेले खडे, अपूर्ण साईट पट्ट्या, सिमेंटचे पाईप अस्ताव्यस्त पडलेले होते रात्री अप रात्री अपघात होण्याची संभावना होती ,त्यावेळी तेथील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
या बातमीची दखल घेऊन खत्री कॉन्ट्रक्शन त्वरित काम चालू केले, या बातमीमुळे तेथील लोकांनी एसआर 24 न्यूज़ या साप्ताहिकाचे आभार मानले व असेच रोखठोक बातम्याच्या देत जावा असा मोलाचा सल्ला दिला आणि आभार मानले.
एसआर 24 न्यूज़ न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट बातमी प्रसिध्द होताच बंद पडलेल्या जुने भिगवन व डिकसळ या ठिकाणच्या रस्त्याच्या कामास जलदगतीने सुरुवात

0Share
Leave a reply













