तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे :तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, सामाजिक कार्यकर्ते तथा डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक, अनेक सत्तांतर झाले मात्र पाटील कुटुंबाचे एकनिष्ठ राहून तन मन धनाने कार्य केल्याने आपणास कार्यकर्त्यांचे बळ व निष्ठेला फळ मिळाल्याची भावना धाराशिव जिल्हा परिषदेचे नूतन अर्थ व बांधकाम सभापती सिद्धेश्वर कोरे यांनी आपले भावना माध्यमशी बोलताना व्यक्त केली.
नंदगाव सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, उपसभापती, पंचायत समिती सदस्य अशा विविध पदावर काम करून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. एवढेच नव्हे तर नेहमी कार्यकर्त्यांना बळ घेऊन आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ना पदर मोड करून पक्षासाठी व साहेबांसाठी प्रामाणिकपणे काम केले. याचा मला सामान्य कार्यकर्ता म्हणून अभिमान असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
एका सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांला सभापतीचा स्पर्धेत नाव नसतानाही आमदार राणा दादा पाटील यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यास बळ दिल्याने कार्यकर्ते ही मनापासून धन्यवाद देत आहेत.
अणदूर गटातून अड. दीपकदादा आलूरे सारखे धडाडीचे व विकासाला प्राधान्य देणारे, सर्व समावेश नेतृत्वाला फटका बसण्याची खंत ही यावेळी बोलताना व्यक्त केली.
आपणास मतदारसंघातील सर्वच कार्यकर्त्यांनी मनापासून प्रेम केल्याने यश संपादन करण्यात आल्याचे सांगून येणाऱ्या काळात पक्षाच्या आदेशाचे निस्वार्थपणे काम करून जिल्ह्याच्या विकासाला अग्रक्रम देणार असल्याचे भावनाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
कार्यकर्त्यांचे बळ-निष्ठेला फळ, मनापासून समाधानी -सभापती सिद्धेश्वर कोरे यांची भावना..!

0Share
Leave a reply












