तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : अणदूर येथील श्री खंडोबा पणन सहकारी संस्थेचे व्यवस्थापक दिगंबर मोळगडे यांचे सुपुत्र डॉक्टर दिनेश मोळगडे यांना नायर हॉस्पिटल मुंबई येथे डीएम स्पेशालिटी न्यूरोलॉजी करीता प्रवेश निश्चित झाला विशेष म्हणजे महाराष्ट्रात शासनाच्या चार जागाराज्यात एकूण चार जागा असून एक जागा डॉक्टर दिनेश यांनी हस्तगत केली आहे. विशेष मेडिकल मधील सर्वोच्च डीएम न्यूरोलॉजी या शेवटच्या पदवीचा करता प्रवेश मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. त्यातीलच एक डॉक्टर दिनेश यांना विशेष मेडिकलमधील सर्वात शेवटचे सर्वोच्च डीएम मेंदू रोग तज्ञ-न्यूरोलॉजिस्ट या पदवी प्रवेश मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक अभिनंदन केले जात आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जवाहर विद्यालय येथे शिक्षण घेऊन शासकीय विद्यालय लातूर येथे एमबीबीएस पदवी संपादन करून कोलकत्ता येथे नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये जनरल मेडिसिन एमडी पूर्ण केले. तर सोलापूर येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट फिजिशन म्हणून फिलोसॉफी पदवी घेतले.
त्यांच्या या यशाबद्दल तुळजाभवानी साखर करण्याचे चेअरमन सुनील मालक चव्हाण, दीपक दादा आलूरे, महादेव अण्णा मुळे, सरपंच रामचंद्र आलूरे, डॉ. सिद्धरामप्पा खजुरे, अमोल नरवडे, सरपंच सरोजनी कबाडे, प्रभात मंडळ, जय मल्हार पत्रकार संघ, 8 फार्मा ग्रुप यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
खुदावाडीचे सुपुत्र डॉ. दिनेश मोळ गड्डे यांना, विशेष मेंदू रोग तज्ञ-न्यूरोलॉजिस्ट पदवी प्रवेश..! सर्वत्र अभिनंदन

0Share
Leave a reply












