SR 24 NEWS

इतर

तमनर आखाडा येथे मुळामाई देवी यात्रेनिमित्त आज भव्य निकाली कुस्ती व उद्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन; लाखो रुपयांची बक्षिसे, दिग्गजांची उपस्थिती

Spread the love

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथील ग्रामदैवत मुळामाई देवी मंदिराच्या यात्रेला मंगळवार, दि. २४ मार्च रोजी यंदा पारंपरिक उत्साहासह अधिक रंगतदार स्वरूप प्राप्त झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्ती व बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून गावात खेळाडू, आयोजक, ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये प्रचंड उत्साह व उत्सुकता पाहायला मिळत आहे.

या जंगी कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ मंगळवार, दि. २४ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजल्यानंतर होणार असून महाराष्ट्रातील नामांकित व दमदार मल्लांच्या उपस्थितीने तमनर आखाडा दणाणून जाणार आहे.यावर्षीच्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी तब्बल १ लाख ११ हजार रुपये रोख पारितोषिक आणि चांदीची आकर्षक गदा ठेवण्यात आली आहे. ही गदा कै. तुकाराम सखाराम तमनर यांच्या स्मरणार्थ सौ. मनीषा आप्पासाहेब तमनर यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच, दि. २५ मार्च रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून आकर्षक बक्षिसांमुळे राज्यभरातील कुस्तीपटू व बैलगाडा प्रेमींचे लक्ष या स्पर्धेकडे वेधले गेले आहे.या भव्य कुस्ती स्पर्धेसाठी हिंदू धर्म रक्षक राष्ट्रीय श्रीराम संघ चे संस्थापक अध्यक्ष सागरभैय्या बेग तसेच गुलाबनाना बर्डे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला अधिक प्रतिष्ठा प्राप्त झाली असून ग्रामस्थांकडून त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दिलीप भागवत तमनर, लहानू दगडू बाचकर, बाबुराव रामकिसन तमनर, गंगाधर तमनर, संताराम तमनर, गोरक्षनाथ पंढरीनाथ तमनर, अशोक पंढरीनाथ तमनर, मच्छिंद्र भागवत तमनर, पाटिलबा चंद्रभान तमनर, पोपट रमेश आयनोर, हरिभाऊ तुकाराम तमनर, ताराचंद एकनाथ तमनर, अशोक एकनाथ तमनर, सोपान भिवाजी बाचकर यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य व सर्व शसकीय सेवेतील तरुणांनी व नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

याशिवाय तमनर आखाडा येथील समस्त ग्रामस्थांनी एकदिलाने काम करत यात्रेचा हा पारंपरिक सोहळा भव्य स्वरूपात उभा केला आहे. गावात आकर्षक सजावट, मुळामाई देवीचे दर्शन, विविध धार्मिक कार्यक्रम आणि रंगणाऱ्या कुस्त्यांमुळे परिसरात जत्रेसारखे वातावरण निर्माण झाले आहे.

कुस्तीप्रेमी, तरुणाई, महिला वर्ग तसेच आजूबाजूच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुळामाई देवी यात्रेशी जोडलेली ही निकाली कुस्तीची परंपरा ही केवळ स्पर्धा नसून गावाच्या संस्कृतीचा, एकोप्याचा आणि पारंपरिक खेळांविषयीच्या प्रेमाचा जिवंत वारसा आहे. यंदाचा सोहळा अधिक भव्य, रोमांचक आणि ऐतिहासिक ठरणार असल्याचे चित्र आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!