SR 24 NEWS

इतर

एक राष्ट्र – एक ऑर्गेनिक मानक : राज्यसभेत खा. डॉ. अजित गोपछडे यांची बनावट ऑर्गेनिकवर कडक कारवाईची मागणी

Spread the love

नांदेड प्रतिनिधी/ धम्मदिप भद्रे : देशात ऑर्गेनिक उत्पादनांच्या नावाखाली वाढत चाललेल्या बनावट व्यापाराचा गंभीर मुद्दा उपस्थित करत खा.डॉ.अजित गोपछडे यांनी कठोर कारवाईची मागणी केली. राज्यसभेत शून्य कालदरम्यान त्यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. फळे, भाजीपाला, औषधे, कॉस्मेटिक्स तसेच तांदूळ (धान) यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर खोटे “ऑर्गेनिक” लेबल लावून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे, जे थेट नागरिकांच्या आरोग्याची खेळ करत आहे त्यामुळे अशा बाबींवर गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कठोर पावले उचलावेत अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी सभागृहात केली.

राज्यसभेत बोलताना आज खा. अजित गोपछडे यांनी ऑरगॅनिक बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले ते म्हणाले रासायनिक घटकांनी युक्त अन्नपदार्थांच्या वाढत्या वापरामुळे कॅन्सर सारख्या गंभीर आजारांमध्ये वाढ होत आहे. या भीतीमुळे सामान्य नागरिक जास्त किंमत देऊन ऑर्गेनिक उत्पादने खरेदी करण्यास तयार असतो; परंतु बाजारात बनावट उत्पादनांच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्राहकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. या प्रवृत्तीमुळे एका बाजूला जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रामाणिक शेतकऱ्यांच्या परिश्रमांना आणि ब्रँड इंडियाच्या प्रतिमेलाही धक्का बसत आहे. त्यांनी सरकारकडे “वन नेशचं – वन ऑर्गेनिक स्टँडर्ड” लागू करण्याची मागणी करत देशभरात ऑर्गेनिक उत्पादनांसाठी एकसमान आणि कठोर नियम तयार करण्यात यावेत. तसेच प्रत्येक ऑर्गेनिक उत्पादनावर क्यूआर कोड अनिवार्य करणे, देशभरात आधुनिक तपासणी प्रयोगशाळांची संख्या वाढवणे आणि बनावट ऑर्गेनिक उत्पादने विकणाऱ्यांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करावी. बनावट ऑग्रेनिक हा केवळ आर्थिक फसवणुकीचा प्रकार नसून जनतेच्या आरोग्याविरुद्धचा गंभीर गुन्हा आहे.

आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅक टू बेसिक्स आणि “एक एकर, एक हंगाम” या दृष्टिकोनाचा उल्लेख करत नैसर्गिक शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की या उपक्रमामुळे मृदा स्वास्थ्याचे संरक्षण होईल आणि देशवासियांना शुद्ध व सुरक्षित अन्न उपलब्ध होईल असेही खा. डॉ. अजित गोपछडे यांनी सभागृहासमोर स्पष्ट केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!