SR 24 NEWS

सामाजिक

जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थ्याना टिफीन व बॅग वाटप, हिंदुस्थान फिडसचा सामाजिक हात,आदर्श विद्यालयाचा मोठा उपक्रम 

Spread the love

सोनई प्रतिनिधी / मोहन शेगर : सोनई येथील आदर्श विद्या मंदिर विद्यालयाने प्राथमिक विद्यालयात आज जागतिक महिला दिनाचे औचित्य हिंदुस्थान फिडस तर्फे हजारो विद्यार्थ्यांना टिफिन डबा व बॅगचे वाटप संस्थेचे अध्यक्षा जयश्री गडाख व सचिव रविराज गडाख,कंपनीचे सेल्स मॅनेजर सातपुते व मा. नरसिंह कुलाडे, ग्राहक सेवा अधिकारी किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित मान्यवराच्या हस्ते 1 ली ते 5 वी वर्गातील 870 मुलांना भेटवस्तू देऊन एक सामाजिक उपक्रमचा आदर्श घालून दिला.

   यावेळी सोनई व परिसरातील अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांना सन्मानपूर्वक सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पानासवाडी या संस्थेचे सचिव श्री रविराज तुकाराम पा गडाख यांनी भूषविले तर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती जयश्रीताई रविराज गडाख यांच्या शुभहस्ते उपस्थित 150 अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांचा सत्कार करण्यात आला.

तर हिंदुस्थान फीड्स कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर श्री. पांडुरंग सातपुते , सेल्स ऑफिसर नरसिंह कुलाडे, ग्राहक सेवा अधिकारी किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थीत कार्यक्रम संपन्न झाला आहे. प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापक श्री अनिल दरंदले यांनी संस्थेचे अध्यक्ष जयश्रीताई गडाख व सचिव रविराज गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची आदर्शयुक्त माहिती दिली.कार्यक्रम प्रसंगी पांडुरंग सातपुते यांनी “गाय व माय” याबद्दल माहिती देताना म्हणाले,गाय आपण चांगला चारा व खाद्य म्हणजे हिंदुस्थान फिडस ची कांडी वापरावी म्हणजे गाय चांगले दूध देईल,म्हणजे माय व मुलगा यांचे आरोग्य चांगले राहील.

     कार्यक्रमाचे आयोजक यश पशुखाद्यचे आदिनाथ घावटे आणि व्यंकटेश पशुखाद्यचे सोमनाथ बंग यांच्या नियोजनाखाली यशस्वीरित्या कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती जाधव एम.बी व कोंगे व्ही.जी.यांनी केले. तर आभार श्रीमती दिपाली निमसे मॅडम यांनी केले.*जिल्हा परिषद सोनई गट व खरवंडी गट, व परिसरातील मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका, मदतनीस, अशा सेविका यांचा मोठा सहभाग*


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!