राहुरी : सोनई पोलीस ठाण्यात कार्यरत असताना कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) विजय माळी यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सध्या त्यांची नियुक्ती राहुरी पोलीस ठाण्यात होती.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय माळी हे सोनई पोलीस ठाण्यात कार्यरत असताना मागील सहा महिन्यांच्या कालावधीत पोलीस ठाणे हद्दीत दाखल झालेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत वरिष्ठांकडून वेळोवेळी स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनांचे पालन करण्यात त्यांनी कथितरीत्या दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान, सोनई पोलीस ठाणे हद्दीत अग्नीशस्त्रांचा वापर करून खून व खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.चौकशी प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ नये तसेच निष्पक्ष तपास व्हावा यासाठी विजय माळी यांना शासन सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोनईचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी निलंबित – वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका

0Share
Leave a reply












