पुणतांबा प्रतिनिधी / ऋतिक लाहोटी :राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील कमलबाई प्रभाकर धनवटे (वय ७५) या दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घरातील कोणालाही कोणतीही कल्पना न देता घरातून निघून गेल्या असून त्या अद्याप परत आलेल्या नाहीत.याबाबत त्यांचे पुत्र गणेश प्रभाकर धनवटे यांनी पुणतांबा दूरक्षेत्र, राहाता पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून बेपत्ता महिलेचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
बेपत्ता कमलबाई धनवटे यांच्या अंगावर लाल रंगाची साडी, लाल रंगाचे स्वेटर असून डोक्यावर पांढऱ्या रंगाचा स्कार्फ आहे. सदर वर्णनाची महिला कोणाला आढळून आल्यास किंवा काही माहिती मिळाल्यास त्वरित खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नातेवाईक व पोलिसांनी केले आहे.
संपर्क : गणेश धनवटे – ८८३०६६१०११ / ८८९६९०५९०५
Leave a reply













