SR 24 NEWS

राजकीय

तीन मामी बहिणी तुळजापूर तालुक्यात तुळजापूरशी शिवराज पाटलांचे जवळचे नाते..!

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : देशाचे माजी गृहमंत्री तथा लोकसभेचे सभापती शिवराज पाटील यांचे काल पहाटे निधन झाले. शिवराज पाटील साहेबांचे मामा वसंतराव पाटील हे औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील ते एक खाणदानी घराणे शिवराज पाटील साहेबांना मोठं करण्यामागं मामा वसंतराव पाटील यांचं खुप मोठं योगदान वसंतराव पाटील यांच्या तीन मुली तुळजापूर तालुक्यातच दिलेल्या पहिली सुरेखा वसंतराव वडगावे ज्या पंचायत समिती तुळजापूरच्या सभापती होत्या.दुसरी सुवर्णा रवींद्र कानडे आणि वैशाली विक्रम आलुरे .अणदूर शी जवळचे नाते .अणदूर येथे कै . आलुरे गुरुजी यांच्या नागरी सत्कार समारंभा निमित्त आयोजित कार्यकमास शिवराज पाटील साहेबांचं भाषण हे अविस्मरणीय अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतानाही शिवराज पाटील साहेब हे आवर्जून येथे उपस्थित होते .

 सार्वजनिक प्रचार सभा असो निवडणूक सभा असो किंवा एखादा सामाजिक उपक्रम असो.एवढा मोठा माणूस अणदूरमध्ये अनेकवेळा हेलिकॉप्टरने उपस्थित रहतो हे विसरता येत नाही किंवा अणदूरकर विसरत नाहीत .


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!