राहाता प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : लोणी खुर्द येथील एका चिकन विक्रेत्याने चिकन सोलण्याच्या ड्रममध्येच चक्क जाणीवपूर्वक लघुशंका करून, तेच चिकन हिंदू ग्राहकांना विकल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. हा प्रकार केवळ अन्नदूषण नव्हे, तर धार्मिक भावना दुखावणारा, समाजात तेढ पसरवणारा आणि माणुसकीला काळीमा फासणारा आहे.
सदर प्रकार समजताच हिंदुत्ववादी कार्यकर्ते, व ग्रामस्थांनी एकत्र येत लोणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. यावेळी वेताळबाबा चौकात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला व दोषींवर कठोर कारवाई व्हावी म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठ्यासंख्येने निवेदनावर सह्या करुन कार्यवाहीची जोरदार मागणी केली.
सदर घटना लोणी खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील असल्याने काही ग्रामस्थांनी प्रथम गावस्तरावरच प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामपंचायतीत झालेल्या चर्चेदरम्यान काही जिहादी मानसिकतेच्या लोकांनी सदरील कृत्याचे उघड समर्थन केले व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी हुज्जत घातली.सदर प्रकाराला ग्रामपंचायतीचे मूक समर्थन असल्याचा संशय निर्माण झाला असून, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने इतर विक्रेत्याचे दुकान पुन्हा सुरू करण्यात आले, त्यामुळे पुन्हा वाद चिघळला.
पोलिसांनी सदर घटनेची माहिती घेऊन त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाही करावी यासाठी लोणी पोलीस ठाण्याचे API कैलास वाघ साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रसाद घोगरे, बजरंगदल अध्यक्ष सागर राक्षे, राधाकीसन आहेर, सागर उबाळे, विकी राक्षे, विशाल आव्हाड, विजय ढगे, भाऊसाहेब धुळसौंदर, नामदेव पवार, कैलास कुऱ्हाडे, अमोल पवार, निलेश गवांदे. तसेच लोणी येथेल अनेक ग्रामस्थ उपस्थित होते सकल हिंदू समाज व ग्रामस्थांच्या वतीने या प्रकारात कठोर कारवाई होईपर्यत संघर्ष सुरू राहील.
लोणी खुर्दमध्ये अन्नदूषणाचा संतापजनक प्रकार उघड – सामाजिक तेढ व धार्मिक भावना दुखावण्याचा घृणास्पद प्रयत्न

0Share
Leave a reply












