तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हागलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर व चिवरी परिसरात काँग्रेस आघाडीला मोठा धक्का बसला असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे. अणदूर व चिवरी येथील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी धाराशिव येथील भाजप संपर्क कार्यालयात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसला सोडचिट्टी देत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
या राजकीय उलथापालथीमुळे तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, त्याचा फायदा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीला होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
अणदूर (ता. तुळजापूर) येथील काँग्रेस पक्षाचे माजी ग्रामपंचायत सदस्य विशाल शेटे, युवा नेते आण्णासाहेब आलूरे, रवी (गोटू) मुळे तसेच चिवरी गावाचे माजी सरपंच सचिन बिराजदार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून तसेच पक्षाच्या संघटनात्मक कार्यपद्धतीने प्रेरित होऊन आपण हा निर्णय घेतल्याचे नवप्रवेशी कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.
यांच्यासोबत बीटीएम (BTM) ग्रुपचे सदस्य संदीप धुमाळ, अभिलाष करपे, स्वप्निल भुरे, शिवाजी परीट, गणेश करपे, सुशांत भुरे, सुशील करपे, परमेश्वर कुंभार, प्रशांत भुरे, रविराज यावलकर, शिवानंद करपे, आनंद यावलकर, दत्ता गायकवाड, दीपक संगशेट्टी, आकाश कसबे, विशाल कांबळे, नबीलाल शेख, विशाल खराडे, बसवेश्वर भंडारकवठे, विशाल ठाकूर, अभिजित सूर्यवंशी, गुंडूशा मदुळकर, ऋषिकेश धोत्रे, अमोल घुगे आदी कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला.
या सर्व नवप्रवेशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टीत मनःपूर्वक स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या प्रवेशामुळे अणदूर व परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असून, गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी सुनील मालक चव्हाण, दीपक दादा आलूरे, धनराज मुळे, साहेबराव घुगे, रोहित भैय्या पडवळ, महादेव सालगे, विक्रांत दुधाळकर, प्रविण मुळे, इमाम शेख यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply













