तुळजापूर / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यात सर्वात मोठी व प्रतिष्ठेची म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अणदूर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण आ. राणा दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्षम व विशेष सोईनियुक्त बनवणार आहोत.अणदूर गटा अंतर्गत गाव तांड्या वस्तीवर विकासाचा अजेंडा कायम ठेवणार असून जाणकार मतदारांनी कोणत्याही अफवा अपप्रचार यांना बळी न पडता शाश्वत विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांचे कमळ घरोघरी पाठवण्याचे आवाहन तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राजकारणातील चाणक्य सुनील मालक चव्हाण यांनी केले.
जुने नवे हा वाद न करता सर्वांनी एकोप्याने महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आ. राणा दादा पाटील यांचा शब्द प्रमाणबद्ध मानून तुळजापूर तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणून विकासाला गती देण्याचे आवाहनही यावेळी बोलताना केले.
आपल्या निवडणुकीतील जाहीरनामाबाबत चव्हाण म्हणाले की, जिल्हा परिषद आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षा उपक्रम राबवून जिल्ह्यात वेगळा आदर्श निर्माण करणार आहोत. आरोग्य शिक्षण या महत्वाच्या विभागावर लक्ष केंद्रित करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न, गटातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याबरोबरच ग्रामदैवत खंडोबा मंदिराचा ब वर्गात समावेश, जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेबरोबरच वत्सला नगर शाळेचा नावलौकिकात भर घालण्यासाठी विशेष उपक्रम राबवणार असून शिक्षक कॉलनीतील श्रीराम मंदिराचे उभारनीं, महिला व बाल वर्गासाठी हुतात्मा स्मारकात स्वतंत्र व्यायामाचे व बालोद्यान, जिल्हा परिषद अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध योजना, परिसरातील स्मशानभूमी सुशोभी करण, वत्सला नगर-संजय नगर-सिद्धार्थ नगर येथे पिण्याचे स्वच्छ पाणी आय प्ल्याट, सर्व तांड्यांचा विकास करणार असल्याचेही सुनील मालक चव्हाण यांनी सांगितले.
साहेबराव घुगे, दीपक घोडके, सिद्राम शेटे, बालाजी मोकाशे, डॉ. नागनाथ कुंभार, धनराज मुळे, अप्पू धम्मुरे, दयानंद मुडके, संगप्पा हगलगुंडे, आप्पासाहेब शेटे, डॉ.विवेक बिराजदार, विशाल शेटे, मनोज मुळे, निलेश आलूरे, गुणवंत मुळे, विक्रांत दुधाळकर, यांना सोबत घेऊन गटाबरोबरच तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून मतदारांनी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विकासाची वाट सक्षम पणे राबवण्याच्या आव्हान चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
आ. राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली, अणदूर गट सक्षम बनवणार – सुनील मालक चव्हाण

0Share
Leave a reply












