सोनई प्रतिनिधी / मोहन शेगर : देशाचे केंद्रीय कृषी व ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नववर्षाच्या प्रारंभी कुटुंबासह श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे भगवान शनीदेवाचे मनोभावे दर्शन घेतले. सायंकाळी सुमारे ५.३० वाजता त्यांनी शनीतेल अभिषेक करून शनी चौधाऱ्यावर विधिवत पूजा केली. दर्शनानंतर देवस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात त्यांनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला.
नेवासा तालुक्याच्या वतीने आमदार विठ्ठल लंबे, संगमनेर तालुक्याच्या वतीने आमदार अमोल खताळ तसेच देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी नगराध्यक्ष डॉ. करण घुले, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसारडा, तालुका अध्यक्ष प्रताप चिंधे, नगरसेवक अंकुश म्हस्के, माऊली पेचे, मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे, शिरेगावचे सरपंच किरण जाधव, राजेंद्र मते, डॉ. भारत कर्डक आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार विठ्ठल लंबे यांनी नेवासा तालुका हा संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यांच्या मध्यवर्ती भागात असल्याने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र शेतकरी उत्पादक केंद्र (FPO) उभारण्याची मागणी निवेदनाद्वारे मांडली. या मागणीची दखल घेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्य शासनाकडून तात्काळ अहवाल मागवून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे राज्य सदस्य अॅड. सयाराम बानकर, माजी उपाध्यक्ष सुरेश बानकर, पोलीस पाटील रमेश डोळे, आसाराम कोरडे व सरपंच कैलास दरंदले यांनी देवस्थानचे तत्कालीन अध्यक्ष स्व. बाबुराव बानकर यांच्या चरित्रग्रंथाची प्रत केंद्रीय मंत्र्यांना भेट देत सन्मान केला.
दर्शनानंतर मंत्री चौहान यांनी भाविकांमध्ये मिसळून संवाद साधला तसेच नागरिकांसोबत सेल्फी काढले.दरम्यान, शनिशिंगणापूर दर्शनानंतर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोनई येथील प्रसिद्ध ‘अशोका वडापाव सेंटर अँड रेस्टॉरंट’ येथे कुटुंबासह भेट देत वडापावचा आस्वाद घेतला. नववर्षानिमित्त ही भेट दरवर्षी जपली जाणारी परंपरा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पद कितीही मोठे असले तरी मातीशी नाते, श्रद्धा आणि सामान्य जनतेशी असलेली जवळीक कायम ठेवणाऱ्या नेतृत्वाचे हे उदाहरण असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
यावेळी अशोक कुसळकर, गणेश कुसळकर, संदीप कुसळकर, गंगाराम कुसळकर, सागर कुसळकर व जगदीश कुसळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केंद्रीयकेंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे शनिशिंगणापूर येथे दर्शन; सोनईतील ‘अशोका वडापाव’चा कुटुंबासह घेतला आस्वाद मंत्र्यांचे स्वागत केले.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे शनिशिंगणापूर येथे दर्शन; सोनईतील ‘अशोका वडापाव’चा कुटुंबासह घेतला आस्वाद

0Share
Leave a reply












