SR 24 NEWS

सामाजिक

दिग्दर्शक, कास्टींग दिग्दर्शक, काॅस्ट्यम डिझाईनर प्रसाद भागवत यांना अमृत गौरव पुरस्कार प्रदान

Spread the love

एसआर 24 न्यूज़ प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य शासन आयोजित पुरस्कार २०२४ साठी प्रसाद सुनंदा त्र्यंबक भागवत राहणार दाढ बु || यांना‘ कलारत्न ‘ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी चित्रपट ईंडस्टीत दिग्दर्शक, कास्टींग दिग्दर्शक व काॅस्ट्युम डिझाईनर इत्यादी क्षेत्रात ते उल्लेखनीय काम करतात. याची दखल घेत हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी साहित्यीक श्री.बाळासाहेब तोरस्कर यांनी भूषवले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार डॉक्टर ख.रं.माळवे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष, आयोजक मा. श्री. नागेश हुलवळे यांनी स्वागत पर भाषण केले व संवीधान ऊद्देशीका वाचन केले, सर्व मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी प्रमुख उपस्थिती पद्मश्री डॉ. डी. जी. यादव(अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान संस्था भारत सरकार) डॉ. डेरिक एंजल्स(नासा शास्त्रज्ञ) डॉ. सुकृत खांडेकर, श्री. भानुदास केसरे, श्री. प्रमोद महाडिक, श्री. रामकृष्णन कोळवणकर, श्री. राजेश कांबळे, डॉ. नॅन्सी अब्लुकर्क इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

हा पुरस्कार प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य , नॅशनल लायब्ररी मुंबई, वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई व प्रमोद सुर्यवंशी यांनी नॅशनल लायब्ररी मुंबई येथे आयोजीत केला गेला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!