SR 24 NEWS

सामाजिक

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन, रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास बँकेकडून मिळणार आकर्षक भेटवस्तू

Spread the love

राहुरी कृषी विद्यापीठ प्रतिनिधी  : महात्मा फुले कृषी विद्यापीठ (एमपीकेव्ही), राहुरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेच्या वतीने गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदानाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या उद्देशाने या समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशातून नागरिकांना रक्तदानासाठी प्रेरित करण्यात येत असून, एका रक्तपिशवीमुळे एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे समाजातील प्रत्येक निरोगी नागरिकाने या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून आरोग्यासाठीही लाभदायक मानले जाते त्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातील एसबीआय शाखेत आयोजित या रक्तदान शिबिरात विद्यापीठातील कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शाखा व्यवस्थापक नवाज देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेकडून आकर्षक भेटवस्तू (गिफ्ट) देण्यात येणार आहे. त्यामुळे या सामाजिक उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदानाद्वारे समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!