SR 24 NEWS

सामाजिक

आधार फाउंडेशन व एस आर 24 न्यूजकडून रंगनाथ तमनर यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान

Spread the love

श्रीरामपूर : आधार फाउंडेशन व एसआर 24 न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात कडीत बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रंगनाथ देवराम तमनर (अण्णा) यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुभाष शेठ गुदेचा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी एसआर 24 न्यूजचे संपादक रमेशराव खेमनर, यशवंत सेना जिल्हाप्रमुख विजयराव तमनर, शिवसेना (शिंदे गट) शेतकरी आघाडीचे महाराष्ट्र उपप्रमुख रवींद्रभाऊ मोरे, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक संतोष शेळके, राहुरी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मोरे सर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

रंगनाथ तमनर हे यशवंत सेना, अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत असून सामाजिक, धार्मिक व जनहिताच्या उपक्रमांमध्ये ते सातत्याने सक्रिय असतात. तसेच ते एसआर 24 न्यूजमध्ये पत्रकार म्हणूनही कार्य करीत आहेत. त्यांच्या समाजसेवेची दखल घेत त्यांना सलग पाचव्या वर्षी राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

या सन्मानाबद्दल श्री संत सद्गुरू बाळूमामा पालखी क्रमांक १ चे कारभारी गुंडापंत पाटील, सतीश परकाळे, एकनाथ मेनगर, कडीतचे प्रथम लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर वडीतके, ओझरचे सरपंच गणेश खेमनर, भारत बलमे, श्रीकांत बाचकर, आप्पासाहेब तमनर, रंगनाथ हळनोर, तुळशीराम वडीतके, बाबासाहेब वडीतके, ज्ञानेश्वर मेनगर, शांतवत बनसोडे, सुनील मेनगर आदींसह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!