नांदेड प्रतिनिधी /धम्मदिप भद्रे : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आज नांदेड येथील निमा भवन येथे ‘गजानन पाटील संचलित योग’ या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात योग साधकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रेरणेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्वस्थ आरोग्यासाठी योग’ हा संकल्प घेऊन मोठ्या संख्येने योग साधक या योग सोहळ्यात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर, प्रसिद्ध योग प्रशिक्षक गजानन पाटील यांनी योगशास्त्रावर सविस्तर विवेचन केले. संस्कृत श्लोकांचा आधार घेत त्यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले आणि त्यानंतर उपस्थितांकडून योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा या विशेष योगिक क्रियांचे प्रत्यक्ष संचालन केले. २१ वर्षांच्या योग अनुभवाचा लाभ घेत उपस्थितांनी अत्यंत शांतचित्ताने या क्रिया पूर्ण केल्या.
या सोहळ्यात निमा (NIMA) संघटनेचे पदाधिकारी, शहरातील प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स, प्रगतीशील शेतकरी, व्यापारी, तसेच महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी निमा भवन प्रशासनाने आपले सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल संयोजकांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
कार्यक्रमाची सांगता सर्वांनी प्रसाद रूपी फलाहार सेवन करून केली. या प्रसंगी आहार आणि आरोग्याबाबत विशेष मार्गदर्शन करून, संतुलित आहाराचे महत्त्व प्रात्यक्षिकासह उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.
या कार्यक्रमास डॉ. हरदीप सिंघ खालसा, डॉ. शेखर चौधरी, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. अविनाश वडजे, डॉ. संजय देलमाडे, डॉ. श्रोराम कल्याणकर, डॉ सुनील पिंपळे, डॉ स्वरूपा जाधव, सौ. गायत्री कदम, सौ. सारिका यादव, श्रीमती आशा खंदारे, सौ. सुरेखा भोसले, सौ. शिला गायकवाड, मीना कोणापुरे, सौ. अनुपमा जैन, संतराम गीते, जगदीश जाजू, प्रशांत जैन, दिगांबर शिंदे, जयवंत सूर्यवंशी आणि सचिन डाखोरे यांच्यासह नांदेड शहरातील विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
’निमा भवन’ येथे खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रेरणेने जागतिक योग दिन उत्साहात संपन्न

0Share
Leave a reply









