अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हागलगुंडे : बीड लातूर स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा सध्याचे लातूर जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष, विठ्ठल साई साखर कारखान्याचे अध्यक्ष सन्माननीय बसवराज पाटील यांनी अखेर बाजी मारली. या विषयाचे खात्री पाटलांची एन्ट्री हा अंदाज तंतो खरा ठरला. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी उत्साहाने आनंद शिगेला पोहोचल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बसवराज पाटील हे दीर्घ काळापासून सामाजिक -शैक्षणिक -धार्मिक व संस्था चालक क्षेत्रात अग्रेसर असून ग्रामीण भागातील प्रश्नावर त्यांनी सातत्याने आवाज उठवण्याचे काम केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जनाधार सर्व सामान्याचे काम करण्याचे असलेले संपर्क, विकासात्मक प्रतिमा यामुळे त्यांना यश मिळायची भावना ॲड. दीपक आलूरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.त्यांच्या यशाबद्दल अणदूर सह तुळजापूर तालुक्यात फटाके- पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी साहेबराव घुगे, चेतन तोग्गी, स्वप्निल घुगे, काशिनाथ घुगे, किशोर बायस, छोटू मोकाशी असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Leave a reply













